Swapneel Joshi-Prasad Oak: स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र

2 hours ago 1

‘सुशीला-सुजीत” या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करून घोषणा

मुंबई (Swapneel Joshi-Prasad Oak) : स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक (Swapneel Joshi-Prasad Oak) या दोन आघाडीच्या मराठी कलाकारांनी नुकत्याच एकमेकांना त्यांच्या चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या आणि हे दोघे एकत्र यावेत अशा प्रतिक्रिया मराठी चित्रपट रसिकांमध्ये उमटल्या. त्यानंतर काही तासांतच हे दोघे एकत्र येत असल्याची बातमी येवून धडकली आहे. प्रसाद आणि स्वप्नील हे आगामी ‘सुशीला-सुजीत’ (Sushila-Sujeet) या चित्रपटातून एकत्र येत आहेत.

प्रसाद ओक यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून स्वप्नील जोशीचे कौतुक केले. ‘नवरा माझा नवसाचा २’ नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटाने ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसाद ओक यांनी स्वप्नीलचे कौतुक केले आणि लगोलग स्वप्नील जोशी यांनी प्रसाद ओक यांना त्यांच्या २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘धर्मवीर २’साठी खास शुभेच्छा दिल्या. स्वप्नील जोशी (Swapneel Joshi-Prasad Oak) आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र आहेत.

समाजमाध्यमांवर त्यानंतर हे दोघे रुपेरी पडद्यावर एकत्र यायला हवेत आणि त्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहोत अशा प्रतिक्रिया रसिकांकडून या पोस्टनंतर उमटल्या. लगोलग प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होत आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्स यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक हे (Sushila-Sujeet) चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर असून हे एक यशस्वी कॉम्बिनेशन मानले जाते. स्वप्नील जोशी, (Swapneel Joshi-Prasad Oak) प्रसाद ओक, संजय मेमाणे यांच्यासह मंजिरी ओक आणि निलेश राठी यांची सुद्धा ही एकत्रित निर्मिती आहे. पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

“या चित्रपटाचे नाव जरी ‘सुशीला-सुजीत’ असले तरी हे नाव ऐकण्या किंवा वाचण्यापेक्षा बघण्यात खूप गंमत आहे. त्याचे विज्युअल गमतीशीर आहेत. ती काय गंमत आहे ते तुम्हाला त्याचे पोस्टर बघून कळते,” असे उद्गार स्वप्नील जोशी यांनी काढले आहेत.

अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका यांमधून दमदार भूमिका करणारे स्वप्नील जोशी आज आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी या आधीही काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, फुगे, रणांगण, वाळवी यांसारख्या मराठी तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार, लाईफ जिंदगी यांसारख्या हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या आहेत.

प्रसाद ओक यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि जवळपास मलिकांमध्ये कामे केली आहेत. रमा माधव, बाळकडू, चिरंजीव, फर्झंद, क्षण, ती रात्र, एक डाव धोबीपछाड, हिरकणी, धर्मवीर यांसारखे चित्रपट, पिंपळपान, आभाळमाया, हम तो तेरे आशिक है, क्राईम पॅट्रोल यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव या चार चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, बेचकी, रणांगण, आलटून पालटून यांसारखी नाटके यांनी केली आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article