Teli Samaj Melava: तेली समाजाचा राज्यस्तरीय परिचय मेळावा

2 hours ago 1

समाजाने मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधावा: माजी खासदार सुरेश वाघमारे यांचे आवाहन

अमरावती (Teli Samaj Melava) :  आजच्या या आधुनिक युगात समाज व कुटुंब विखुरले जात असून त्याचा परिणाम नवीन पिढीवर होत आहे. परंतु अशा मेळाव्याच्या माध्यमातून विचारांची व विवाह जुळण्याच्या संबंधांची आदान प्रदान होते आणि संवाद साधता येतो ,त्यामुळे अशा प्रकारचे परिचय मिळावे आयोजित करणे आवश्यक असून समाजाने अशा मेळाव्यांमधून एकत्र येत संवाद साधावा असे आवाहन तेली समाजाचे नेते व माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी उपस्थित समाज बांधवांना केले. (Teli Samaj Melava) परिचय मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबवित समाजपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी अमरावतीत सर्व शाखीय (Teli Samaj Melava) तेली समाजातील उपवर- वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Teli Samaj Melava

श्री संताजी समाज विकास संस्थेच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद

पंचवटी चौक स्थित पीडीएमसीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल सभागृहात आयोजित या (Teli Samaj Melava) मेळाव्याचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी सकाळी तेली समाजाचे नेते व माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या हस्ते झाले. श्री संताजी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राज्यस्तरीय मेळाव्यास नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर कन्हेरे , माजी आमदार राजू तिमांडे ,माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर अशोक डोंगरे , स्वागताध्यक्ष सुनील गुल्हाने, जना बँकेचे अधिकारी यतीन्द्र नाडकर्णी , दामोदरराव मोगरकर, समाज भूषण दिल्ली येथील लक्ष्मणराव शिरभाते चहा वाले , राहुल गुल्हाने ,प्रवीण राठोड कारंजा लाड ,गंगाधरराव आसोले ,श्रीरामपंत सुखसोहळे, पत्रकार संजय बनारसे ,आतिश शिरभाते ,विवेक गुल्हाने ,डॉ. प्रा .अजय गुल्हाने ,चंद्रशेखर पिंपळे ,डॉ. अरुणा गुल्हाने अविनाश टाके, अशोकराव हांडे ,शंकरराव श्रीराव, विनोदराव अजमिरे,संजय जावळे, हर्षल काळे, दत्तात्रय कपिले ,प्रभाकरराव सव्वालाखे ,संजय जीरापुरे ,किशोर गुल्हाने ,विलास मुडे, दिलीपराव बिजवे ,अरुण गुल्हाने , गजाननराव राजगुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित उपवर मुला मुलींच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (Teli Samaj Melava) मेळाव्यास मार्गदर्शन करताना सुरेश वाघमारे म्हणाले की खरा संस्कार हा समाजातून मिळतो परंतु आज समाज प्रगती करीत असला तरी संवाद कमी झाला आहे अशी खंत व्यक्त करीत भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी प्रत्येकाने संवाद साधावा असा सल्ला त्यांनी दिला. माजी महापौर विलास इंगोले यांनी श्री संताजी समाज विकास संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करीत संस्थेच्या पुढील उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मेळाव्याचे आयोजक व अध्यक्ष तसेच श्री संताजी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या भविष्यातील वाटचालीविषयी माहिती देत ध्येयधोरणे ठरवीत संस्था वाटचाल करीत असल्याचे सांगितले.

Teli Samaj Melava

संस्थेने आयोजित केलेला हा चौदावा मेळावा असून कोणताही आर्थिक सोर्स नसताना केवळ (Teli Samaj Melava) समाज बांधवांच्या मदतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. आगामी काळात समाजासाठी ठोस असे कार्य करणार असल्याची ग्वाही प्राध्यापक संजय आसोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली .यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार राजीव तिमांडे म्हणाले की आज पूर्वीप्रमाणे परिस्थिती राहिली नसून समाज विखुरलेला आहे, पण विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी असा मेळावा आयोजित केला याचा आपणास अभिमान असल्याचे सांगून संस्थेने संताजी महाराजांचे स्मारक, वसतिगृह ,अभ्यासिका अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी अपेक्षा देखील याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय रायकर यांनी तर संचालन प्रा. डॉ. अनुप शिरभाते, सौ स्वाती जयसिंगपूरे ,सौ मनीषाताई गुल्हाने यांनी केले.

या मेळाव्यास गोवा ,मध्य प्रदेश ,गुजरात ,छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील (Teli Samaj Melava) तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास शिरभाते, मिलिंद शिरभाते, मधुकरराव शिंदे, संजय रायकर, ऍड चारुदत्त गुल्हाने, राजीव बनारसे, गजानन झोपाटे ,आशिष आगरकर, प्रा. सुनील जयसिंगपूरे, अतुल बिजवे, किशोर श्रीराव, अविनाश राजगुरे ,सुनील पचगाडे, नंदू रावेकर यांनी परिश्रम घेतले.

विवाहबंधन पुस्तिकेचे विमोचन

तेली समाज (Teli Samaj Melava) राज्यस्तरीय परिचय मेळाव्याच्या निमित्ताने सर्व उपवर वधू यांची सचित्र माहिती असलेल्या विवाहबंधन या पुस्तिकेचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेमध्ये तब्बल सातशे मुला मुलींची माहिती असल्याचे प्रा. संजय आसोले यांनी सांगितले. याप्रसंगी विवाह बंधन पुस्तिकेचे संपादक डॉ. केशव गाडबैल व सहसंपादक मिलिंद शिरभाते तसेच संपादक मंडळाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या परिचय मेळाव्यात 125 चा वर उपवर मुला मुलींनी आपला परिचय करून दिला.

तेली व माळी समाजाने एकत्र येत ताकद दाखवावी- किशोर कन्हेरे

आजच्या ऑनलाईनच्या युगात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून अशा (Teli Samaj Melava) मेळाव्यांमुळे प्रत्यक्ष आदान प्रदान होऊन गैरप्रकारांना आळा बसतो. त्यामुळे अशा प्रकारचे परिचय मिळावे होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूर येथील ओबीसी नेते किशोर कन्हेरे यांनी केले. राजकारणात समाजाचे वजन वाढविण्याची गरज असून जोपर्यंत तुम्ही तुमची संख्या दाखविणार नाही, तोपर्यंत तुमचे महत्त्व वाढणार नाही ही बाब लक्षात घेता प्रत्येक समाजाने आपली संख्या व आपली शक्ती दाखवीत राजकीय वाटा पदरात पाडून घ्यावा असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला. या सोबतच राज्यात तेली व माळी समाजाची ताकद मोठ्या प्रमाणावर असून या दोन्ही समाजाने आगामी काळात एकत्र येऊन आपली राजकीय शक्ती दाखवून देत राजकीय पक्षांना आपली दखल घेण्यास भाग पाडावे असे आवाहन देखील किशोर कन्हेरे यांनी याप्रसंगी केले.

तेली समाजाला राजकीय वाटा द्या, मेळाव्यात एकमताने प्रस्ताव पारित

राज्यात व देशात तेली समाजाचे मोठे प्राबल्य असून एकूण लोकसंख्येपैकी 15 टक्के तेली समाजाची लोकसंख्या आहे ,असे असताना राजकीय क्षेत्रात मात्र तेली समाजाला पाहिजे त्या प्रमाणात राजकीय हिस्सा मिळत नसल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे . ही विदारक परिस्थिती बघता आगामी सर्वच निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी तेली समाजाला गृहीत धरून लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय हिस्सा देत तेली समाजातील लोकांना संधी द्यावी असा प्रस्ताव आशिष आगरकर यांनी (Teli Samaj Melava) मेळाव्याच्या पटलावरून मांडला. यावेळी उपस्थित हजारो तेली समाज बांधवांनी या प्रस्तावाचे समर्थन करीत व प्रचंड घोषणा देत एकमताने सदर प्रस्ताव पारित केला. विविध राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात तेली समाजाच्या उमेदवारास उमेदवारी द्यावी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील 15 टक्के वाटा देत तेली समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article