Maharashtra assembly election 2024Pudhari News Netwrok
Published on
:
20 Nov 2024, 5:09 am
Updated on
:
20 Nov 2024, 5:09 am
Thane : पुढारी ऑनलाइन डेस्क - राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 पासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये 2014 व 2019 मध्ये विधानसभा निवडणुक लढविलेल्या जुन्याच चेहऱ्यांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिली आहे. तर यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
ठाणे विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी तीन हात नाका वन विभाग कार्यालयात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.Pudhari News network
डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली पूर्वेतील स . वा. जोशी महाविद्यालयात आपल्या सहकुटुंबा सह मतदानाचा हक्क बजावला. Pudhari News network
मुरबाड विधानसभा क्षेत्राचे महायुती भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी पत्नीसह बदलापूर जवळील सागाव येथे मतदानाचा हक्क बजावला.Pudhari News network
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्नी स्मिता यांच्यासह कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.Pudhari News network
ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कोपरी पाचपाखडी येथील मतदान केंद्र क्र 338 येथे मतदान केले.Pudhari News network
मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. Pudhari News network
कल्याण ग्रामीण मतदार संघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. Pudhari News network