Thane | धक्कादायक! अंबरनाथमध्ये नवजात अर्भकाला इमारतीवरून फेकले

6 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Nov 2024, 5:53 am

Updated on

22 Nov 2024, 5:53 am

अंबरनाथ : स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथच्या पश्चिम भागात घडली आहे. यात या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतले आहे.

येथील शंकर हाईट्स फेज दोनमधील डी विंगमधील इमारतीत एक महिला तिच्या आईसह वास्तव्याला होती. गुरुवार (दि.21) रात्रीच्या सुमारास तिने घरातच स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर बाथरूममधून इमारतीच्या डक्टमध्ये तिला फेकून दिले. सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर उमेश पाटील यांनी तिथे धाव घेत पोलिसांना पाचारण केले. अंबरनाथ शहरात घडलेली ही घटना संतापजनक आणि लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया यानंतर स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली. पोलिसांनी मृत अर्भकाच्या आईला आणि आजीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article