उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर दाखल होत उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. तर सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गडचिरोलीत सर्वाधिक ३० टक्के मतदान तर नांदेडमध्ये सर्वाधिक कमी १३. ६७ टक्के मतदान झालं आहे. अशातच राजकीय नेते मंडळी देखील मतदानाचा हक्क बजावत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर दाखल होत उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आज मतदान सुरू असताना राजकीय विषयावर बोलणं योग्य नाही. तर राज्यातील मतदारांना आवाहन करतो की, मतदान करा आणि स्वाभिमान जपा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं.
Published on: Nov 20, 2024 12:27 PM