Uddhav Thackeray: दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही : उद्धव ठाकरे

2 hours ago 1

कळमेश्वरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे थाटात उद्घाटन

कळमेश्वर (Uddhav Thackeray) : दिल्लीतून महाराष्ट्राचा छळ करण्यात येत आहे, परंतु दिल्ली समोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते आज रविवारी कळमेश्वर येथील गुरू गोविंदसिंह चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते (Uddhav Thackeray) बोलत होते.

यावेळी मंचावर माजी मंत्री सुनील केदार, अनिल देशमुख, खासदार श्याम बर्वे, खासदार संजय राऊत, शिवसेना उबाठा गटाचे विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ताताई कोकद्दे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माझी जि.प. अध्यक्ष रश्मीताई बर्वे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील, खरेदी विक्रीचे अध्यक्ष बाबाराव कोढे, मोहपा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष माधव चर्जन, मोहपा नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष फिरोज शेख, श्रीधर गणोरकर पंचायत समिती सभापती प्रभाकर भोसले, उपसभापती श्रावण दादा भिंगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे, माजी सभापती वैभव घोंगे, राजेंद्र सुके, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे, शिवसेनेचे सुरेश लंगडे, बिरजू रघुवंशी, राहुल चूनारकर, यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठा जन समुदाय उपस्थित होता.

माजी मंत्री सुनील केदार यांनी केले शिवसेना उद्धव ठाकरे यांचे स्वागत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे बोलताना म्हणाले, सुनील केदार माजी जुने सहकारी असून बाबासाहेब केदार सरकार स्थापनेसाठी सुनील केदार यांच्या रूपाने आम्हाला मदत केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या रूपाने आता परत आपण एकत्र आलेलो आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवले त्यांच्यावर अन्याय केला, परंतु उच्च न्यायालयाने तो निर्णय अवैध ठरवत रश्मी बर्वे यांना न्याय दिला. परंतु यासाठी गुन्हेगार कोण? हा प्रश्न आहे. मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे होणारे हे पहिलेच अनावरण होते. मालवणच्या दुर्घटनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला त्यामुळेच तो पुतळा कोसळल्याचा आरोप याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार प्रचंड वेगाच्या वार्‍यामुळे हा पुतळा कोसळला.

मात्र जो अहवाल आला, त्यात असे म्हटले आहे की, पुतळा निर्मितीच्या कार्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरला गेलं. सोबतच पुतळा उभारत असताना त्या जागेची व्यवस्थित व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे साहित्य कशाप्रकारे गंजल आणि त्यातूनच हा पुतळा कोसळला, हे सर्वांपुढे आले अशी टीका ही माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मात्र कळमेश्वरच्या पुतळ्याबाबत आम्ही पाहणी केली. माहितीनुसार या पुतळ्याची योग्य पद्धतीने उभारणी करण्यात करण्यात येऊनच या पुतळ्याचे आज अनावरण मी केले असल्याचे ते (Uddhav Thackeray) म्हणाले.

या अश्वरूढ शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी व्हावी अशी कळमेश्वर नगरवासीयांची इच्छा होती. जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पुतळ्याचे अनावरण करणार नाही, तोपर्यंत या पुतळ्याच्या अनावरणाचे कार्य होणार नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगतात, या गोष्टीची दखल घेत माजी मंत्री सुनील केदार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या अश्वरूप पुतळ्याचे अनावरण समारंभासाठी वेळ घेतली. सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्थेच्या वतीने या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा पुतळा त्या समितीने आणि नागरिकांनी झाकून ठेवला होता. मात्र छत्रपतींचा पुतळा अशा पद्धतीने झाकून ठेवणे हे योग्य नव्हतं. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पुतळ्याचे अनावरण करावे, असे एक मत पुढे आले होते. तेव्हा माझी मंत्री सुनील केदार यांच्या विनंतीला मान देऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आजचा दिवस ठरवला आणि ठरल्याप्रमाणे आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:३० या पुतळ्याचे अनावरण केले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाची प्रास्तविक घनश्याम मकासरे यांनी केले.

येत्या दोन महिन्यात महाविकास आघाडीत सत्तेवर येणार : सुनील केदार

खोक्याचे आमीष दाखवून आमदारांना पळवून धुक्याने सत्तेवर आलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवून सर्वसामान्य आणि शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या सरकारला सत्तेबाहेर केल्याशिवाय शांत बसणार नाही संपूर्ण नागपूर जिल्ह्यात सहा चे सहाही आमदार महाविकास आघाडीचे राहील व शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून महाविकास आघाडी सोबतच राहील असे प्रतिपादन याप्रसंगी माजी मंत्री सुनील केदार यांनी केले यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा सरकारवर टीका करत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसताना धमकावून आपणास जेलमध्ये टाकल्याने सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article