राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. त्यापूर्वीच मतदारांना अमिषाची ठिणगी पडली. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाच नाही तर भाजपाला विरोधकांनी आरोपांनी शब्द बंबाळ केले. भाजपावर चहु बाजूंनी आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. कारण कॅमेऱ्यात जे समोर आले ते लोकशाहीसाठी लाजिरवाणे होते. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकुर आणि हितेंद्र ठाकुर यांनी तावडे यांच्यावर मतदारांना पाच कोटी वाटप करण्याचा आरोप लावला. ज्या हॉटेलमध्ये तावडे होते. तिथे बविआच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चार तास घेराव घातला. विरार पूर्वमधील विवांता या हॉटेलमध्ये खोली क्रमांक 406 मधून 9 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यावरून मोठा गदारोळ उडाला. हा हायहोल्टेज ड्रामा उभ्या देशानेच नाही तर जगाने पाहीला.
काय आहे आरोप?
बहुजन विकास आघाडीने विनोद तावडेंवर कॅश ऑन वोटचा आरोप केला. विरारमधील उमेदवार राजन नाईक यांना ते 5 कोटी रुपये देण्यासाठी आल्याचा आरोप त्यांनी केला. ही रक्कम मतदारांना वाटपासाठी आणल्याचा आरोप झाला. यावेळी हॉटेलमधून डायरी सापडल्या. त्यात पैशांच्या नोंदी नावानिशी आढळल्या. यावेळी हॉटेलमधून 9 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. ही रक्कम कुणाची आहे हे निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणांनी अद्याप जाहीर केलेले नाही. अर्थात विरोधकांनी ही रक्कम 5 कोटी नव्हे तर 15 कोटी रुपये असल्याचा दावा केला. त्यातील 10 लाख रुपयेच जर समोर आले तर मग हे 14 कोटी 90 लाख गेले तरी कुठे?
हे सुद्धा वाचा
आचार संहितेत किती रक्कम बाळगता येते?
आता या गदारोळानंतर आचार संहितेत एखादी व्यक्ती किती रक्कम सोबत घेऊन जाऊ शकते, याची चर्चा सुरू झाली आहे. गरज असेल आणि योग्य कारणासाठी एक रक्कम नागरिकांना नेता येते. पण त्याचा स्त्रोत आणि कशासाठी ही रक्कम नेण्यात येत आहे, त्याची माहिती द्यावी लागते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यातील उमेदवारांना अधिकत्तम 40 लाख रुपये खर्च करता येते. तर छोट्या राज्यातील आणि केंद्र शासित प्रदेश जसे गोवा, मणिपूर, पुद्दुचेरीमध्ये केवळ 28 लाख रुपये खर्च कराता येतो.
किती रक्कम सोबत नेता येते?
निवडणुकीदरम्यान उमेदवारांना किती रक्कम सोबत नेता येते याची चर्चा होत आहे. याविषयीचे मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार, एखादी व्यक्ती जवळपास 2 लाख रुपये सोबत नेता येते. इतक्याच रुपयात तो काही खरेदी पण करू शकतो. तो जवळपास 50 हजारांची रोख रक्कम सोबत घेऊन जाऊ शकतो. दोन लाख रुपये असेल तर पोलीस लगेच तुम्हाला अटक करते असे नाही. ही रक्कम कुठून आणि कशासाठी आली. रुग्णालयातील उपचारासाठी ही रक्कम नेत असाल तर त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. ही रक्कम कुठून आणली ते सांगावं लागतं. जर उमेदवाराने निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रक्कम खर्च केली तर त्याच्यावर लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10ए नुसार कारवाई होते. उमेदवारावर 3 वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यास प्रतिबंध घालण्यात येतो.