वाल्मिक कराडचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळेच आता त्यांची पुन्हा एकदा रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे. मात्र या सार्यांनंतर अंजली दमान यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. ज्या रुग्णालयामध्ये संतोष देशमुख यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांना धनंजय मुंडे आणि कराडच बदली करून आणलं होतं असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय.
दोन दिवस रुग्णालयात मुक्काम ठोऊन संतोष देशमुख हत्तेचा आरोपी वाल्मिकी कराड हा पुन्हा तुरुंगात परतलाय. तब्येत बरी नसल्याच्या कारणानं कराडला दवाखान्यात नेण्यात आलं होतं. मात्र विविध टेस्ट केल्यानंतर कराडचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. सीटी स्कॅन, शुगर, ब्लड प्रेशर, पोटदुखी संदर्भात विविध चाचण्या केल्या गेल्या. मात्र कराडचे सगळे रिपोर्ट व्यवस्थित असून तो ठणठणीत असल्याचं समोर आलंय. अंजली दमानिया यांनी कराडला नेमका काय आजार झालाय त्याच्या कोणत्या तपासण्या झाल्या याचे डॉक्युमेंट्स सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. त्याच्या काही तासातच कराडचे सर्व रिपोर्ट नील आल्याचं सांगत त्याला पुन्हा तुरुंगात पाठवलं गेलं. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांची भेट घेत हत्येच्या तपासाबद्दल चर्चा देखील केली आहे. दरम्यान बीडच्या रुग्णालयात वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होतोय. जिल्हा रुग्णालयात आरोपींसाठी स्वतंत्र कक्ष असूनसुद्धा कराडला मिनि आयसीयूतल्या सर्जिकल वॉर्डात ठेवण्यात आलं होतं. कराडसाठीच सर्जिकल वॉर्डातील अकरा बेड्स देखील रिकामे केले गेले. विरोधक या सार्याला आरोपींची खातिरदारी म्हणतायेत. तर सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य ऐवजी स्वतंत्र वॉर्डात कराडला ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jan 27, 2025 10:32 AM