बसस्थानक परिसरात चोरट्यांच्या कारवाया वाढल्या ल् पोलीस चौकी झाली नावापूरती
वसमत (Wasmat Bus Stand) : शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढणार्या प्रवासी महिलेच्या बॅग मधील सोन्याचे दागिने असलेला डबा चोरट्याने लंपास केला यात दहा तोळे सोन्याचे दागिने होते हे दागिने घेऊन चोरटे लंपास झाले या घटनेने खळबळ उडाली आहे याप्रकरणी वसमत शहर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे वसमत येथील बस स्थानकात चोरट्यांच्या कारवाया वाढल्या आहेत बसस्थानक परिसरात असलेली पोलीसचौकी असून ओळंबा नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे.
वसमत शहर पोलीस ठाण्यात प्रतिभा प्रताप जाधव (३२) रा.किन्होळा ह.मु.बँक कॉलनी वसमत यांनी तक्रार दिली की, २२ नोव्हेंबरच्या दुपारी त्या वसमत बस स्थानकातील बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेला दागिन्याचा डबा चोरट्यांनी लंपास केला.या डब्यात चार तोळ्याचा पोहेहार १४ ग्रॅमचे मिनीगंठण नऊ ग्रॅम चे टॉप्स तीन ग्रामचे वेल तीन अंगठ्या वजन १५ ग्रॅम व पंधरा ग्रामचे नेकलेस असे जवळपास दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते.
पर्स मधले असलेला डबा चोर त्यांनी गर्दी चा फायदा घेऊन काढून घेतला व पळ काढला त्यांच्या लक्षात हा प्रकार आला तोपर्यंत चोरटे लंपास झाले होते. याप्रकरणी प्रतिभा जाधव यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे त्यांच्या तक्रारीवरून दहातोळे वजनाचे दागिने चोरी गेल्याप्रकरणी चार लाख ९२ हजार पाचशे रुपयांची चोरी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. (Wasmat Bus Stand) याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बीजी महाजन करत आहेत. आता या चोरीचा तपास पोलीस कशा पद्धतीने लावतात चोरट्यांचा तपास लागतो की ही चोरी पुन्हा इतर चोरीच्या घटनांप्रमाणेच गुन्हा नोंदवून तपास कायम सुरू राहतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
वसमत येथील बसस्थानकासाठी पोलीस चौकी कार्यरत करण्यात आली आहे मात्र पोलीसचौकीचा वसमत बस स्थानकातील प्रवाशांसाठी कोणताही लाभ होत नाही अधून मधून पोलीस चौकी उघडते कधी कर्मचारी असतात कधी नसतात पोलीस चौकीचे कर्मचारी कधी प्रस्थानकात फेरफटका मारताना आढळत नाहीत काही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यापर्यंत प्रवाशांना जावे लागते तोपर्यंत चोरटे गुन्हेगार फरार होतात.
पोलीस चौकी समोरच अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनही अनेकदा उभी असलेले पहावयास मिळतात. (Wasmat Bus Stand) बसमध्ये प्रवाशांची गर्दी असताना पोलीस चौकीतील कर्मचार्यांनी फेरफटका मारला तर चोरट्यावर वचक बसू शकतो मात्र असे कधी घडत नाही त्याचा फायदा चोरटे घेतात व वसमत बस स्थानकात चोरीच्या घटना महिलांना त्रास देण्याच्या घटना वाढल्या आहेत पोलीस चौकी असून नसून सारखीच अशीच परिस्थिती आहे या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.