World Spine Day: पाठीच्या कण्याचे आरोग्य जपण्याचे महत्त्व

2 hours ago 1

जागतिक पाठीचा कणा दिवस

World Spine Day : जागतिक पाठीचा कणा दिवस दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश पाठीच्या कण्याच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पाठीशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आहे. यावर्षीचा विषय, “तुमची पाठ हलवा”, आपल्या दैनंदिन जीवनशैलीत शारीरिक हालचालींचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. योग्य आसन, मग ते बसताना, उभे राहताना किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करताना असो, हे पाठीच्या कण्याशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाठीचा कणा आणि आसन एकमेकांवर मोठा प्रभाव टाकतात, आणि पाठीशी संबंधित समस्या सहसा प्रौढपणी दिसून येतात, त्या वयानुसार अधिक गंभीर होत जातात. (World Spine Day) पाठीच्या कण्याच्या समस्यांचे सामान्य कारणे, पाठीच्या कण्याशी संबंधित समस्यांचे प्रमुख कारण म्हणजे बैठी जीवनशैली. चुकीचे बसणे, पाठीला पुरेशी आधार मिळत नाही, तासंतास गॅझेट्सकडे पाहणे, या सगळ्यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. त्यामुळे स्नायूंचा ताण वाढून, पाठीचा कणा प्रभावित होतो. याशिवाय, घरातच मर्यादित हालचाल करणे, विशेषतः सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे हाडांची गुणवत्ता खराब होऊन पाठदुखीच्या समस्यांमध्ये वाढ होते. खराब रस्ते, खड्डे आणि धक्क्यांमुळे प्रवासादरम्यान पाठीला होणाऱ्या झटक्यांमुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो आणि स्लिप डिस्क सारख्या समस्यांचा धोका वाढतो.

कोविडनंतरचा परिणाम

कोविडनंतर, अनेक कामाच्या ठिकाणी घरून काम करण्याची (WFH) संकल्पना आली आहे. पण, घरी योग्य आसन ठेवले नाही तर, (World Spine Day) पाठीशी संबंधित समस्या वाढू शकतात. लोकं बेडवर काम करताना किंवा चुकीच्या आसनात बसल्याने स्नायूंवर ताण येतो. यामुळे पाठीचा कणा आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि पाठीशी संबंधित समस्यांची शक्यता वाढते. योग्य बसण्याची स्थिती पाठीला योग्य आधार देते आणि वजनाच्या समान वितरणाची काळजी घेते. जेव्हा वजनाचा केंद्रबिंदू पुढे किंवा मागे सरकतो, तेव्हा स्नायूंवर ताण येतो. वेळेत दुरुस्ती न केल्यास, स्नायूंचा आधार कमी होतो आणि ताण लिगामेंट्स आणि सांध्यांवर येतो, ज्यामुळे स्पॉन्डिलोलिस्थेसिस आणि स्कोलियोसिस सारख्या विकृतींच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अादित्‍य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे (ABMH) ज्येष्ठ संचालक, न्यूरोसायन्सेस आणि न्यूरोसर्जन डॉ. राकेश रंजन सांगतात, आमच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या ५०% रुग्णांना पाठदुखी किंवा मानदुखीच्या समस्या आहेत. विशेषतः क्रीडा क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या तरुणांमध्ये सायटिका समस्या सामान्य होत आहे. याशिवाय, शेतकरी आणि गावकरी जे अनेक वर्षे जड वजन उचलतात, त्यांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. ही स्थिती प्रसूतीनंतरही उद्भवू शकते.” ते पुढे म्हणतात, “डिजेनेरेटिव्ह स्पाइन समस्या, जसे की स्पॉन्डिलोलिस्थेसिस, पूर्वी ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये दिसत होत्या. मात्र, आजच्या पिढीत चुकीच्या आसनामुळे या समस्या ४० च्या दशकातच दिसू लागल्या आहेत.

पुढील उपाय

सर्वसाधारणपणे, योग्य शारीरिक हालचाली आणि जीवनशैलीत सुधारणा करून बहुतेक पाठीशी संबंधित समस्या टाळता येऊ शकतात. परंतु, काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. आजकाल, मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी (MIS) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे (World Spine Day) पाठीच्या कण्याशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यात मोठी मदत झाली आहे. यामध्ये स्पाइनल कॉर्ड स्टिम्युलेटर, नर्व्ह रूट ब्लॉक, यांसारखे उपचार पद्धतींचा समावेश आहे. पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि त्यासाठी योग्य आसन आणि नियमित शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. पाठीशी संबंधित समस्यांवर वेळीच उपाययोजना न केल्यास, त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. पाठीच्या कण्याचे आरोग्य राखण्यासाठी सजग राहणे आणि योग्य उपचार घेणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article