राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. त्यामुळे येत्या 23 तारखेला कोणाला बहुमत मिळणार आणि कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर येत आहे. झी AI च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणाचं पारडं किती जड?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडलं आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. त्यामुळे येत्या 23 तारखेला कोणाला बहुमत मिळणार आणि कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर येत आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा राज्यात पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 18 ते 28 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर झी AI च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 114 ते 139 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 105 ते 134 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 0 ते 08 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
Published on: Nov 20, 2024 08:29 PM