अकोला जिल्ह्यात महायुती तीन ,तर आघाडी दोन जागांवर विजयीFile Photo
Published on
:
23 Nov 2024, 2:26 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:26 pm
अकोला : अकोला जिल्ह्यात महायुतीने अकोला पूर्व ,अकोट व मूर्तिजापूर पुन्हा काबीज करत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने बाळापूर आणि अकोला पश्चीम या दोन जागांवर विजय प्राप्त केला आहे .वंचित बहुजन आघाडीला एकही जागी विजय मिळाला नाही.अकोला पूर्व मतदार संघात भाजपा चे आ .रणधीर सावरकर यांनी हॅट्रिक केली आहे .सलग तिसऱ्यांदा 51हजारांच्या वर मताधिक्क्याने विजयी झाले आहेत .
अकोला पूर्व मतदार संघात भाजपाचे आ.रणधीर प्रल्हादराव सावरकर 1 लक्ष 08 हजार 619 तर शिवसेना उबाठा चे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख गोपाल रामराव दातकर – 58 हजार 6 तर वंचित बहुजन आघाडी चे ज्ञानेश्वर शंकर सुलताने यांना 50 हजार 681 मते मिळाली.अकोट मतदार संघात भाजप- आ प्रकाश भारसाकळे- 93338 (विजयी )काँग्रेसचे महेश गणगणे- 74487 तर वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांना 34132 मते मिळाली.अकोट मतदार संघातून भाजपचे प्रकाश भारसाकळे 18851 मतांनी विजयी झाले आहेत .
मूर्तिजापूर मतदार संघात भाजपा चे हरिश पिंपळे हे 35864 मतांनी चौथ्यांदा निवडून आले . पिंपळे यांना 91820, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांना 55956, तर वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांना 49608 मते मिळाली . अकोला पश्चिम मतदार संघात काट्याची टक्कर झाली.कॉंग्रेस चे साजिद खान पठाण यांना 88718 मते मिळून पठाण विजयी झाले .तर भाजपा चे उमेदवार विजय अग्रवाल यांना दुसऱ्या क्रमांकाची 87435 मते मिळाली .बाळापूर मतदार संघात शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख तथा आ .नितीन देशमुख यांनी आपली जागा राखत विजय मिळवला त्यांना 77369 मते . वंचित बहुजन आघाडीचे नातिकोद्दिन खतिब यांना 65936 मते.तर शिंदे सेने चे बळीराम सिरस्कार यांना 57613 अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली अशी माहिती आहे मात्र अद्याप बाळापूर मतदार संघात कोणाला किती मते मिळाली यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे .