मोजणी केंद्रावर विजय साजरा करताना आमदार तानाजीराव सावंत सोबत संजय गाढवे , धनंजय सावंत , जाकिर सौदागर आदी.Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 4:06 pm
Updated on
:
23 Nov 2024, 4:06 pm
भूम : परंडा विधानसभा निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. यामध्ये शेवटच्या फेरी पर्यंत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. अखेर २७ व्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार प्रा डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे माजी आ. राहुल मोटे यांच्यावर १ हजार ५०९ मतांनी निसटता विजय मिळविला. मतमोजणी पूर्ण होताच राहुल मोटे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतरही निकाल कायम राहिला . यामध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत यांना १ लाख ३ हजार २५४, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना १ लाख १ हजार ७४५ ,वंचितचे प्रवीण रणबागुल यांना १२ हजार ६९८ मते मिळाली. या विधानसभा निवडणुकीत २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ३ लाख ३० हजार ७७३ मतदारांपैकी २ लाख ३० हजार ९७५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या विधानसभा मतदारसंघात ६९.८३ टक्के मतदान झाले होते. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. या मतमोजणी दरम्यान शेवटच्या फेरी पर्यंत कोण विजयी होईल हे सांगता येत नव्हते. अखेर या अटीतटीच्या निवडणुकीत माजी मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा निसटता पराभव केला.