Maharashtra Assembly Election | आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच मतदान करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. Pudhari Photo
Published on
:
20 Nov 2024, 8:44 am
Updated on
:
20 Nov 2024, 8:44 am
नागपूर : लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो? मात्र त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्यालाच जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच मतदान करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.२०) मतदानानंतर माध्यमांशी बोलताना केले. मतदान हे आपले कर्तव्य असून ते बजावले की बोलण्याचा पण अधिकार मिळतो याकडे लक्ष वेधले.
#WATCH | Nagpur: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis, says, "I appeal to everyone that the festival of democracy is going on and participation in democracy is very important. For those who have expectations from their government, it is even more important for them to come out… pic.twitter.com/Vhe8wu1mgL
— ANI (@ANI) November 20, 2024उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये घोळ होता. तो काही प्रमाणात दूर झालेला आहे. वोटिंग सिस्टीम लोकसभेत स्लो होती, आता इम्प्रूमेंट झाले. लोकसभेसारखे कडक ऊन आज नाही, त्यामुळे निश्चित मत टक्का वाढेल. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात महिलांची संख्या 5 ते 6 टक्के पुरुषांपेक्षा कमी आहे. महिला मतदान करून ही टक्केवारी भरून काढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून बोलून दाखविला. जनतेचे प्रेम मिळताना दिसून येत आहे, म्हणून त्यामुळे चेहऱ्यावर हास्य आहे, अशी मिश्कील टिप्पणी फडणवीस यांनी यावेळी केली.
बिटकॉइन सखोल चौकशी व्हावी
बिटकॉइन संदर्भात मीडियात मी बघितले आहे. या संदर्भात योग्य ती चौकशी झाली पाहिजे. सत्य सर्वांसमोर आले पाहिजे तो जनतेचा अधिकार आहे. विनोद तावडे यांनी कुठलेही पैसे वाटले नव्हते. त्यांच्याजवळ पैसे मिळून आलेले नाहीत. आरोप करण्यासाठी इको-सिस्टीम वापरण्यात आली. नाना पटोले, सुप्रिया सुळेंवर जे आरोप लावले, ते माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी लावले आहेत. त्या आरोपांच्या क्लिप समोर आल्या आहेत यावर भर दिला.दरम्यान, माजी मंत्री अनिल देशमुखांवरचा हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी आहे असे उत्तर दिले कालच मी बोललो असेही सांगितले.