अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी याचिकाः:निवडणूक शपथ पत्रात खोटी माहिती दिली; सामाजिक कार्यकर्ते आक्रमक
3 hours ago
1
निवडणूक शपथ पत्रातील खोटी माहिती प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आक्रमक झाले आहेत. त्यांनी सिल्लोड कोर्टात शिवसेना नेते अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी होती. शंकरपल्ली यांच्या याचिकेमुळे अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. यातच माध्यमांमध्ये चर्चा आहे की अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळ समावेशावर भाजपने आक्षेप घेतला आहे. लोकशाहीची हत्या होतेय- शंकरपल्ली सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली म्हणाले की, अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मी आणि माझे पुण्यातील मित्र डॉ. अभिषेक हरिदास आम्ही दोघांनी मिळून फौजदारी याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये आम्ही अब्दुल सत्तार शपथ पत्रात खोटी माहिती देऊन निवडणूक लढवत आमदार होत आहेत. यामुळे कुठेतरी लोकशाहीची हत्या होत आहे. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 210, 223, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 125अ व मानव संरक्षण अधिकार अधिनियम 1993 कलम 30 अन्वये आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांसह अब्दुल सत्तार यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.
मालमत्तांची माहितीही लपवल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी महेश शंकरपल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रात 16 चुका असल्याचे सांगताना त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यात त्यांनी सत्तारांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये प्रचंड तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ हे चुकीचे दाखवण्यात आले आहे. तसेच मालमत्तेवर करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुंतवणुकीची माहिती देखील दाखवण्यात आली नसल्याचे या आरोपात म्हटले आहे. काही मालमत्ताची माहिती शपथ पत्रातून गायब करण्यात आली आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सबाबतही खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. उमेदवारी रद्द करण्याची मागणी 2019 विधानसभा निवडणुकीतही सत्तार यांनी शपथपत्रात अनेक गोष्टी लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली होती. यासंदर्भात देखील सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात देखील न्यायालयाने साताऱ्यांना समन्स बजावले होते. मात्र हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी प्रलंबित आहे. असे असताना सत्तारी यांनी पुन्हा एकदा खोटे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)