Published on
:
21 Nov 2024, 10:29 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:29 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या रिलेशनशीपची चर्चा दीर्घकाळ आहे. पण अद्यापपर्यंत दोघांकडूनही त्यांचे नाते कन्फर्म झालेले नाही. रिपोर्टनुसार, विजयने पुष्टी केली की, तो रिलेशनशीपमध्ये आहे आणि त्याने स्वीकार केलं की, आधी त्याने आपल्या एका सह-कलाकाराला डेट केलं होतं.
मुलाखतीवेळी, विजयने पुष्टी केली की, तो सध्या रिलेशनशीपमध्ये आहे. त्याने मजेशीर अंदाजात म्हटले की, "मी ३५ वर्षांचा झालो आहे; तुम्हाला वाटतं का की मी सिंगल राहीन?" त्याने हेदेखील सांगितले की, 'मी सिंगल राहिलो आहे.' जेव्हा त्याला विचारण्यात आले की, कधी त्याने त्याच्या सह-कलाकाराला डेट केलं आहे. अभिनेत्याने खास करून सांगितले की, तो रोमँटिक नात्यात पुढे जाण्याआधी एक चांगली आणि मजबूत मैत्री बनवणे पसंत करेल. "मी डेटवर जात नाही. मी कुणालाही जानण्याच्या दीर्घकाळानंतर, मैत्री झाल्यानंतरच बाहेर जातो."