महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश आलं. पण अद्याप सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा निघालेला नाही. त्यातच काल रात्री दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थितीत होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बैठकीत काय घडलं याची सविस्तर माहिती दिली.
आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आता उद्या एक महत्त्वाची बैठक होईल. काल मी माझी भूमिका जाहीर केली. आजच्या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा झाली आहे. आमच्यात समन्वय आहे. आम्ही सकारात्मक आहोत. सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे सगळ्यांची काळजी मी घेतो आहे. लाडकी बहीण फेमस आहे लाडका भाऊ फेमस आहे. लाडकी बहीण महत्वाची योजना आहे. सरकारवर जनता खुश आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.