Gautam Adani | 'अमेरिकेकडून कोणतीही विनंती नाही': अदानींच्या अटक वॉरंटवर भारताचा खुलासा Pudhari Photo
Published on
:
29 Nov 2024, 11:41 am
Updated on
:
29 Nov 2024, 11:41 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील अनेक दिवसांपासून भारतात चर्चेत असलेले नाव म्हणजे भारतीय उद्योगपती गौतम अदानी. अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणात अदानी यांच्याविरुद्ध अमेरिका सरकारने अटक वॉरंट जारी केले होते. परंतु अमेरिकेतीव अधिकाऱ्यांकडून कोणतीही विनंती प्राप्त झाली नसल्याचा खुलासाआज (दि.२९) परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, युनायटेड स्टेट्समधील अदानी-संबंधित संस्थांचा समावेश असलेल्या कायदेशीर कारवाईत सरकारची कोणतीही भूमिका नाही. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आरोप ठेवल्याच्या वृत्तांदरम्यान भारताकडून ही टिप्पणी करण्यात आली आहे.
हे प्रकरण म्हणजे "अमेरिकेतील खासगी कंपनी संबंधित व्यक्ती आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांचा समावेश असलेली कायदेशीर बाब आहे". पुढे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये "स्थापित प्रक्रिया आणि कायदेशीर मार्ग" पाळले जाणे गरजेचे आहे.गृह मंत्रालयाला सूचित केल्यास कारववाई शक्य
#WATCH | Delhi: On the Adani indictment issue, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, "This is a legal matter involving private firms and individuals and the US Department of Justice. There are established procedures and legal avenues in such cases which we believe would be… pic.twitter.com/w8CCLqU660
— ANI (@ANI) November 29, 2024गृह मंत्रालयाला सूचित केल्यास कारवाई शक्य
अटक वॉरंटच्या अंमलबजावणीसह भारतात कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी, यूएस अधिकाऱ्यांनी भारतातील गृह मंत्रालयाला सूचित करणे आवश्यक आहे. त्यानंतर गृह मंत्रालय संबंधित फेडरल एजन्सींना विनंतीनुसार कारवाई करण्याचे निर्देश देऊ शकते.
अदानींवरील काय आहेत आरोप?
अमेरिकेतील गौतम अदानीविरुद्धच्या आरोपांमध्ये भारतातील सौरऊर्जा करार सुरक्षित करण्यासाठी लाचखोरी आणि फसव्या आर्थिक खुलासेद्वारे अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याच्या आरोपांचा समावेश आहे.