अमेरिकेत सत्ताबदल होताच महिलांची 4 बी मूव्हमेंटची पुन्हा एकदा तुफान चर्चा सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे ही मूव्हमेंट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2022 साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात मोठा निर्णय दिला. या निर्णयांतर्गत रो विरुद्ध वेड या खटल्यातील निर्णय बदलून महिलांना गर्भपाताचा असलेला राष्ट्रीय अधिकार संपुष्टात आणण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, परंतु आता ट्रम्प यांना विरोध म्हणून अमेरिकेच्या महिलांमध्ये 4 बी मूव्हमेंटची चर्चा चालू झाली आहे.
4 बी म्हणजे काय?
बिहोन ः भिन्नलिंगी म्हणजेच महिला पुरुषाशी लग्न करणार नाहीत.
बिकुलसन ः महिला मुलांना जन्माला घालणार नाहीत.
बियोना ः महिला पुरुषांसोबत डेटिंगला जाणार नाहीत.
बिसेकसेउ ः महिला पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवणार नाहीत.