अविश्वसनीय! तूर्तास एवढेच...:विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरे यांची तीन शब्दांत प्रतिक्रिया

2 hours ago 1
राज्यातील विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून जनतेने महायुतीला कौल दिल्याचे दिसून येत आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एक्स या समाजमाध्यमावर राज ठाकरे यांनी केवळ तीन शब्दांतच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच... अशा शब्दांत राज ठाकरे व्यक्त झाले आहेत. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनाही माहीमकरांनी नाकारले. माहीम मतदारसंघात शिंदे गटाचे सदा सरवणकर, ठाकरे गटाचे महेश सावंत आणि मनसेचे अमित ठाकरे अशी तिहेरी लढत होती. यामध्ये अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांना पराभव स्वीकारावा लागाला. तर ठाकरे गटाचे महेश सावंत हे विजयी झाले. महेश सावंत यांना 50 हजार 123 मते मिळाली. सदा सरवणकर 48 हजार 897 मते घेऊन दुसऱ्या स्थानी राहिले. तर 33 हजार 62 मते घेऊन अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अमित ठाकरे यांचा 17 हजार 151 मतांनी पराभव झाला. निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया राज्यातील निकाल हा अनपेक्षीत आणि अनाकलनीय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या निकालाची अपेक्षाच नव्हती. ही लाट नाही तर त्सुनामीच असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला, त्या सर्वांचे मी आभार मानत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील एकूण आकडेवारी पाहिल्यानंतर या सरकारला एखादा बिल अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्याची आवश्यकताच नसल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाच ठेवायचा नाही, असे चित्र भाजपने महाराष्ट्रात ठेवले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझ्याशी वागणारा महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल? यावर माझा विश्वास नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यामध्ये नक्की काहीतरी गडबड असल्याचा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हे ही वाचा... काँग्रेस 63 वरून 16वर, भाजपची 79 वरून 132वर झेप:महाराष्ट्र निवडणुकीत ठाकरे व शरद पवार कसे बाजूला झाले; लोकसभेनंतर परिस्थिती बदलणारे 5 घटक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय अभूतपूर्व आहे. भाजपने एकूण 149 जागांवर निवडणूक लढवली आणि 132 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे स्ट्राइक रेट 86% आहे. यासह महाराष्ट्रात भाजपचा अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला. 1990 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लहान भाऊ म्हणून 42 जागा जिंकणारा भाजप एकटाच बहुमताच्या जवळ आहे. त्याचवेळी बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंची शिवसेना केवळ 17 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article