भारतासह संपूर्ण जगात दररोज लाखो लोकं रेल्वेने प्रवास करतात. रोज कामावर जाण्यासाठी व आपल्याला हवं त्या मुक्कामापर्यंत पोहचण्यासाठी रेल्वे खूप सोयीस्कर आहे. कारण ट्रेनचा प्रवास हा वेळ वाचवणारा प्रवास आहे. आपण पाहतोच कि सणासुदीच्या काळात प्रवाशांची ही संख्या खूप जास्त होते, कारण इतर साधनांच्या तुलनेत ट्रेन खूप स्वस्त आणि आरामदायक असते. पण आज आम्ही तुम्हाला ट्रेनशी संबंधित एक रंजक गोष्ट सांगणार आहोत. आपल्या घरात करंटसाठी दोन वायर वापरल्या जातात, पण इलेक्ट्रिक ट्रेन फक्त एका वायरवर चालते हे तुम्ही पाहिलं असेलच. हे कसे शक्य आहे ते जाणून घ्या…
ट्रेन एका वायरवर कशी धावते?
कोळशापासून सुरू झालेल्या रेल्वेने आता बरीच प्रगती केली आहे. हाय स्पीड ट्रेन आल्या आहेत, ज्या आता दोन दिवसांचा प्रवास एका दिवसात किंवा काही तासात पूर्ण करतात. त्यातही आता एक बदल झाला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिक इंजिनच्या साहाय्याने रेल्वे धावू लागलीय. यामुळे वेगाबरोबरच पर्यावरणालाही मोठा फायदा झाला. सध्या देशात दोन लोकोमोटिव्ह वापरले जातात, पहिले इलेक्ट्रिक आणि दुसरे डिझेल लोकोमोटिव्ह अजूनही कुठेतरी वापरले जाते.
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हवर चालणाऱ्या गाड्यांना ओव्हरहेड वायरद्वारे करंट वीज मिळते. यामध्ये विजेची तार ट्रेनच्या वर लावलेल्या पॅन्टोग्राफच्या माध्यमातून सतत इंजिनला वीज पोहोचवण्याचे काम करत असते. यामध्ये ट्रेनमध्ये असलेल्या ट्रान्सफॉर्मरपर्यंत वीज पोहोचते, जी कमी-अधिक होते आणि रेक्टिफायरमध्ये ट्रान्सफर केली जाते. येथे आल्यावर त्याचे थेट प्रवाहात रूपांतर होते. तसेच या विजेचे डीसी सहाय्यक इन्व्हर्टरच्या साहाय्याने रूपांतर करून ही फेज एसीमध्ये वळवली जाते, यामुळे ट्रेन आपल्यला एक तारेवर धावताना दिसते.
फेज एसीमध्ये वळल्यानंतर ट्रॅक्शन मोटरमध्ये त्याचा वापर केला जातो, ही मोटर फिरताच ट्रेनचे चाक लगेच फिरू लागते. मीडिया रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक इंजिन चालवण्यासाठी २५ हजार व्होल्टची आवश्यकता असते, ज्याचा पुरवठा थेट पॉवर ग्रिडला केला जातो. अश्याने लांब पल्ल्याचा प्रवास अगदी आरामात केला जातो.
कोणत्याही इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये दोन प्रकारचे पॅन्टोग्राफ वापरले जातात. डबल डेकर पॅसेंजरसाठी WBLचा वापर केला जातो आणि सामान्य ट्रेनसाठी हाय स्पीड पॅंटोग्राफचा वापर केला जातो.