आचारसंहिता लागू झाल्याने आता सर्वांची भाषणे सुसंस्कृत होतील:मंत्री चंद्रकांत पाटील यांची मिश्कील टिप्पणी

2 hours ago 1
निवडणूक अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने आता मला खूप सांभाळून आगामी काळात बोलावे लागणार आहे. निवडणुक या ठराविक वेळेत झाल्या पाहिजे. मागील वेळी २६ नोव्हेंबर रोजी मंत्रीमंडळ शपथविधी पार पडला. आता त्यापूर्वी पुन्हा सरकार अस्तित्वात येणे गरजेचे होते. आता सर्वांनी आचारसंहिता अर्थ समजून घेत सांभाळून सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे सर्वांची भाषणे आता सुसंस्कृत होतील. कोणी चुकीचे वाक्य बोलले तर आता गुन्हा दाखल हाऊ शकतो, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील काही महिने राज्यातील जनतेने राजकीय भाषणांची घसरण पाहिली ती आता थांबेल. सर्वच पक्ष आता त्यांचे उमेदवार जाहीर करुन तयारी करण्यास लागेल. आमची स्क्रिनिंग बैठक पार पडली असून पार्लमेंटरी बोर्ड बैठक देखील केंद्रासोबत होईल. देश हा नियमाप्रमाणे चालत असतो. आता राजकीय पक्षांची बोलणी होऊन उमेदवारी ठरतील. दोन ते तीन पक्ष एकत्र येऊन ज्यावेळी निवडणुकीस सामोरे जात असतात त्यावेळी शेवटपर्यंत जागाचा गुंता कायम राहत असतो. कारण एकच जागा सर्वांना पाहिजे असती. तेवढा गुंता सोडला तर बाकी सर्व गुंता सुटत जोतो. चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्या पक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख नेते असून त्यांनी आम्हाला एखादी गोष्ट विचारली तर सांगतो. परंतु ते अडचणीत येतील असे प्रश्न आम्ही विचारत नाही. नेमक्या आता आपल्याला किती जागा मिळणार कोणत्या मिळाल्या आहेत या बाबी ते आम्हाला नंतर सांगतील. जमते आहे ना गणित, पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे लागेल हे आम्ही त्यांना विचारत असतो. त्यावर ते पुन्हा सत्ता येण्याबाबत खात्रीशीर आहेत. लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना मदत, वीजबील माफी, दूध दरास भाव यामुळे अनेक ठिकाणी चांगला परिणाम दिसून येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article