आनंद दिघेंचे वारसदार ठरले एकनाथ शिंदे; ठाण्यात शिंदेंची निर्विवाद विजयाकडे वाटचालfile photo
Published on
:
23 Nov 2024, 8:36 am
Updated on
:
23 Nov 2024, 8:36 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशी ठाण्याची ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ व्या फेरीअखेर ७० हजारहून अधिक मताधिक्य घेतले आहे. एकनाथ शिंदे यांना कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अडकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने दिघेअस्त्र वापरले होते. मात्र आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजे दिघेंचे वारसदार केदार दिघे पिछाडीवर आहेत. त्यामुळे दिघे यांचे वारसदार एकनाथ शिंदे ठरले आहेत.
ठाण्यात सर्वात लक्षवेधी असलेली लढत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजे दिघेंचे वारसदार केदार दिघे यांच्यामध्ये होणारी लढत ठरली. एकनाथ शिंदे यांना कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अडकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने दिघेअस्त्र वापरले होते. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून केदार दिघे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारत त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार केदार दिघे यांना २६००३ मते मिळाली आहेत. तर एकनाथ शिंदे यांना ९६७३६ मते मिळाली आहेत. लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला येथे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा ६६ हजार एवढी मते अधिक मिळाली होती. प्रचारात ठाकरे विरुद्ध शिंदे असा लोकसभेचा ट्रेंड येथे पाहायला मिळाला.
या मतदारसंघातून शिंदे यांनी यापूर्वी तीन वेळा विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे. आता चौथ्यांदा ते या मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. २००९ पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. २००४ ला सुरुवातीला त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता; मात्र नव्या मतदार रचनेनंतर त्यांचा हक्काचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी हा आहे. मागच्या विधानसभेला म्हणजेच २०१९ ला त्यांच्या विरोधात संजय घाडीगावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.