आभाळ कोसळलेलं नसतं… ब्रेकअप झाल्यानंतर असं सावरा स्वत:ला; ‘या’ टिप्स देतील नवसंजीवनी

1 hour ago 1

अनेकांना ब्रेकअपच्या समस्येतून जावं लागतं. त्यातून मानसिक ताणतणाव निर्माण होतो. काही लोक तर ब्रेकअपमुळे कोलमडून जाताता. आपलं जग हरवल्याचं त्यांना वाटतं. ज्याच्यावर किंवा जिच्यावर भरभरून प्रेम केलं त्या व्यक्तीने अर्ध्यावरच नकार देणं ही गोष्टच सहन होण्यासारखी नसते. त्यामुळे मनाला वेदना होतात. खूप कष्टदायक हा काळ असतो. पण प्रत्येकाला आयुष्यात उभं राहणं आवश्यक असतं. भूतकाळ विसरून भविष्याच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं असतं. जीवनात असा बॅडपॅच येतो हे समजून पुढे जायचं असतं. नवं भविष्य घडवायचं असतं. कारण आयुष्य तेवढ्यावरच थांबलेलं नसतं. त्यामुळे स्वत:च समजूत काढून पुढे गेलं पाहिजे. ब्रेकअप झाल्यानंतर त्यातून कसं बाहेर पडायचं, याच्या काही टिप्स देत आहोत. त्यामुळे बराच फरक पडू शकतो.

संपर्क, संवाद ठेवू नका

ब्रेकअपनंतर पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे त्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे संपर्क ठेवू नका. त्याच्याशी संवाद ठेवू नका. भूतकाळातील गोष्टी विसरणे हे यासाठी आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या संवादांपासून दूर रहा. संदेश पाठवणे, कॉल करणे, किंवा भेटण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टी टाळा. कारण, कोणत्याही प्रकारच्या संवादाने आपल्याला जुन्या दुखण्यांची आठवण होऊ शकते. संपर्क न ठेवल्यास काही दिवस त्रास होईल. पण तुम्ही या बॅडपॅचमधून बाहेर पडाल.

स्वत:चा विकास करा

ब्रेकअप्स नेहमीच स्वःताच्या विकासाचा मार्ग दाखवतात. जुन्या आठवणी आणि विचारांना दूर ठेवण्यासाठी काहीतरी नवीन आणि सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त करा. जुन्या संबंधातून काय शिकायला मिळालं आणि त्या अनुभवांनी आपल्याला काय शिकवले, याची विचार करा. हे सर्व विचार लेखी रूपात मांडणे, आपल्या मनाला शांतता मिळवण्यासाठी मदत करू शकते. त्याचप्रमाणे, आपल्या आरोग्याचा सुधार करण्यासाठी काहीतरी काम करणं हे देखील चांगलं ठरू शकतं.

मित्र आणि कुटुंबाची मदत घ्याल

ब्रेकअप झाल्यानंतर योग्य मदतीची आवश्यकता असते. अशावेळी मित्र, कुटुंब किंवा कोणत्याही जवळच्या व्यक्तींकडून मदत घ्या. कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांचा आधार घ्या. त्यांच्यासमोर व्यक्त व्हा. म्हणजे मन हलकं होईल. धीर देणारे आणि सहानुभूती असणारे मित्र आणि कुटुंब हे नेहमीच महत्त्वाचे असतात. एकत्र जेवण करणे किंवा बाहेर जाऊन वेळ घालवणे याने देखील खूप फरक पडतो. आपले दुःख दुसऱ्यांशी शेअर करणे, मानसिक आधार मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.

जुन्या आठवणी हटवा

जुन्या प्रेमीच्या किंवा प्रेमिकेच्या आठवणी पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करा. हे खूप कठीण असू शकते, परंतु नवीन वातावरण तयार करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्यांनी दिलेल्या भेटवस्तू, कपडे किंवा अन्य आठवणी जागृत करणाऱ्या वस्तू बाजूला ठेवा. या टप्प्यावर, आपल्याला एक विश्वासार्ह मित्र किंवा कुटुंबाचा सदस्य मदतीसाठी कॉल करू शकतो. मानसिक आधार मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article