आमदार केचे यांचा राजकारणातून संन्यास:पक्षातील नेत्यांच्या आरोपांवर म्हणाले - आता हनुमान सारखी छाती फाडून दाखवू का?

5 hours ago 1
आर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुमित वानखेडे रिंगणात असताना, पक्षासाठी काम केले नाही असा ठपका कार्यकर्त्यांकडून ठेवण्यात आला होता. यांना आता हनुमान सारखी छाती फाडून दाखवू का? अशा प्रकारचे उद्गार काढले आणि भावूक होऊन राजकारणातून कायमचा संन्यास घेत आहेत, अशी घोषणा विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी केली. दादाराव केचे यांची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच मोठा राजकीय स्फोट मानला जात आहे. आमदार दादाराव केचे म्हणाले, भाजपमध्ये 1982 पासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. पक्षाने अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी दिली आणि आर्वी मतदार संघात भाजप पक्ष मजबूत करण्यात आले. कधीच आर्वी मतदार संघात कमळ फुलणार नाही अशा प्रकारची चर्चा असताना, 2009 विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून निवडणूक लढलो आणि जनतेच्या आशीर्वादाने विजय मिळवून घेतला. 2014 च्या निवडणुकीत थोड्या फरकाने पराभव झाला होता. मात्र खचलो नाही. पुन्हा जिद्दीने काम करण्यास सुरुवात केली आणि 2019 विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. यंदा मोठे षडयंत्र रचत दुसऱ्याला उमेदवारी दिली पुढे बोलताना दादाराव केचे म्हणाले की, आर्वी मतदार संघातील तिनही तालुक्यातील कानाकोपऱ्यात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असून, मजबूत फळी उभी करण्यात आली. 2024 विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन प्रमुख नेत्यांकडून दिले जात होते, मात्र मोठे षडयंत्र रचले आणि दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. आता हनुमानासारखी छाती फाडून दाखवून का? उमेदवारी न दिल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असता, अनेकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला. सुमित वानखेडे यांच्यासाठी तन मन धनाने पक्षाकरिता काम केले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर केचे यांनी कुठल्याही प्रकारचे काम केले नाही, असा ठपका ठेवण्यात आला. आता आलेले माझा अप्रचार करीत आहेत. यांना आता काम केले की नाही सांगण्यासाठी हनुमान सारखी छाती फाडून दाखवून का? असे म्हणत दादाराव केचे यांनी नाराजी व्यक्त केली. आता सामाजिक कार्य करणार उमेदवारी अर्ज मागे घेणे ही सर्वात मोठी चूक झाली. आता भाजपला कायमचा रामराम ठोकत असून राजकारणातून कायमस्वरूपी संन्यास घेत आहे. माझ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार रुजले आहेत. त्याच विचारांवर सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करीत राहणार, असेही आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article