आरोपी गोळीबार करतो, तेव्हा पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची ? एकनाथ शिंदे यांचा टोला

2 hours ago 1

आम्ही लोकंच्या मनातील सरकार आणलं आणि सर्व स्पीड ब्रेकर तोडून टाकले. आम्ही सर्व स्थगित्या मोडीत काढल्या. आपण कामांचा धडाका लावला. एकीकडे विकास होत आहेत. दुसरीकडे उद्योग येत आहे. राज्यात परदेशी गुंतवणूकही देशाच्या गुंतवणुकीच्या 52 टक्के झाली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

आरोपी गोळीबार करतो, तेव्हा पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची ? एकनाथ शिंदे यांचा टोला

eknath shinde

| Updated on: Sep 29, 2024 | 12:35 PM

बदलापूर एन्काऊंटरवरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. या वादाचे पडसाद पुण्यातील मेट्रोच्या कार्यक्रमात देखील उमटले. पुणे मेट्रोच्या मार्गिकेसह एकूण 22,000 हजार कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर एन्काऊंटरचा विषय काढला.  विरोधकांनी दोन्ही बाजूंनी बोलायची सवयच आहे. बदलापूर प्रकरणात आधी म्हणत होते. आरोपीला भरचौकात फाशी द्या. आता पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलिसांनी बंदूकी शोकेस मध्ये ठेवल्यात का ? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पुणे मेट्रोचा कार्यक्रम खरेतर गुरुवारी होणार होता. परंतू पावसामुळे उद्घाटन होऊ शकले नाही. सर्वकाही तयारी होती. परंतू लोकांना त्रास होईल म्हणून पंतप्रधानांनी स्वत: हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली. इतके संवेदनशील आपले पंतप्रधान आहेत. परंतू विरोधक दोन्ही बाजूंनी बोलतात. आम्ही करतो उद्घाटन असे विरोधक बोलू लागले. दोन्ही बाजूंनी बोलतो चालतो त्याला काय म्हणतात ? माहीती आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांंनी यावेळी केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article