इम्तियाज जलील 32 हजार मतांनी आघाडीवर:अतुल सावे तिसऱ्या क्रमांकावर, म्हणाले - आम्ही अखेरपर्यंत कव्हर करू
3 hours ago
1
छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलीज आघाडीवर पहायला मिळत आहे. पाचव्या फेरीअखेर इम्तियाज जलील यांनी 37 हजार मतांची आघाडी घेतलेली आहे. भाजपचे अतुल सावे 39 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाचे अब्दुल कादरी 3 हजारपेंक्षा जास्त मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अतुल सावे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आम्ही आघाडी घेऊ असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदार पार पडले. आज निकाल जाहीर होत आहेत. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात आतापर्यंत मतमोजणीच्या 4 फेऱ्या झाल्या आहेत. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार आणि माजी खासदार इम्तियाज जलील 37 हजारांपेक्षा जास्त मते घेऊन आघाडीवर आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार आणि विद्यमान मंत्री अतुल सावे केवळ 756 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर आहेत. समाजवादी पक्षाचे अब्दुल कादरी 3 हजारांपेक्षा जास्त मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अतुल सावे पंधराशे मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
काय म्हणाले अतुल सावे?
महायुतीला यश येणार असून आम्ही सत्तेत येणार असल्याचा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे. स्वत:च्या मतदारसंघात पिछाडीवर असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, अशी पिछाडी पहिल्यांदा नाही. 2014 मध्ये देखील 110 बुथवरील मतमोजणीत मी पिछाडीवर असतो. त्यानंतर हळूहळू आघाडी घेतो. पहिल्यावेळेसही 110 बुथमध्ये 45 हजार मतांनी पिछाडीवर होतो. तर 2019 मध्ये दुसऱ्या वेळेस 50 हजार मतांनी पिछाडीवर होतो. पण नंतर आम्ही आघाडी घेतली होती. त्या भागातील अल्पसंख्याकची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना एका बाजूने गठ्ठ्याच्या गठ्ठा मते त्यांना मिळतात. पण नंतर आम्ही ते कव्हर करतो. महायुतीने अडीच वर्षांत प्रत्येक घटकाच्या लोकांसाठी काम केले आहे. त्यामुळे आताचे हे यश आहे, अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिली. हे ही वाचा... अच्छे दिन का किए थे वादा, उनका दिन खराब आएगा:अंबादास दानवे यांचा भाजपला इशारा; विजयाचा व्यक्त केला विश्वास 'हर सितम का जवाब आएगा, देखना इंकलाब आएगा' असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दुपारपर्यंत हाती येईल. मात्र, त्या आधीच अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)