उद्धव ठाकरे यांनी सपत्निक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.Pudhari Photo
Published on
:
19 Nov 2024, 2:25 pm
Updated on
:
19 Nov 2024, 2:25 pm
तुळजापूर : हे तुळजाभवानी माते महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले भ्रष्ट सरकार दहशतवादी कारवाया करीत आहे. या सरकारचा बिमोड कर आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येऊ दे अशी विनवणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुळजापूर येथे शिवसेना उभाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धीरज पाटील यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. या निमित्ताने ठाकरे कुटुंबीयांनी देवीची पाद्य पूजा केली देवीला खन आणि नारळाची ओटी भरली. देवीचे पुजारी कुमार इंगळे यांनी ठाकरे पूजा केली आरती केली व त्यांना आशीर्वाद दिला. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व तुळजापूर येथील पदाधिकारी उपस्थित होते.