भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला डाव आटोपला आहे. पहिल्या डावात भारताकडे 46 धावांची आघाडी आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 150 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 104 धावा करता आल्या. खरं तर या धावा आणखी कमी असू शकल्या असत्या. पण विकेटकीपर ऋषभ पंतची एक चूक नडली आणि टीम इंडियाला 25 धावांचा फटका बसला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 7 गडी बाद 67 धावा होत्या. दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहाने ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. सेट बॅट्समन अॅलेक्स करेला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर हार्षित राणाने नाथन लियोनला बाद केलं. त्यामुळे भारत मोठी आघाडी घेणार हे स्पष्ट झालं होतं. 79 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट पडल्या होत्या. यानंतर जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने 25 धावांची भागीदारी केली. खरं तर या 25 धावा भारताला दंड पडल्यासारख्याच आहेत. कारण ऋषभ पंतने हेझलवूडचा झेल पकडला असता तर ही भागादारी झाली नसती.
दुसऱ्या दिवशी हेझलवूड काही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. पण त्याने मिचेल स्टार्क बऱ्यापैकी साथ दिली. त्याने स्टार्क आणि त्याने मिळून 120 चेंडूंचा सामना केला आणि 25 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 104 धावांपर्यंत मजल मारता आली. जसप्रीत बुमराहच्या षटकावर त्याने हा झेल सोडला. विराट आणि ऋषभ पंतच्या याच्या मधून हा झेल गेला. खरं तर ऋषभ पंतच्या उजव्या हातावर हा झेल होता. पण त्याच्या पायाची मूव्हमेंट योग्यरित्या होऊ शकली नाही.
दुसऱ्या डावात भारताने 200 पार धावा केल्या तर विजयाचा मार्ग सोपा होईल. पहिल्या डावातील विकेट पाहता या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी राहणं कठीण आहे. पण कांगारुंना धोबीपछाड द्यायचा असेल तर 200 पार धावा होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी भारतीय गोलंदाज अशी कामगिरी करतीलच असं नाही. त्यामुळे आता फलंदाजांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. खासकरून विराट कोहली दुसऱ्या डावात कशी खेळी करतो याकडे लक्ष असेल.