एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची शक्यताFile Photo
Published on
:
29 Nov 2024, 2:41 am
Updated on
:
29 Nov 2024, 2:41 am
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
काल राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची सूचना केली होती. यावर आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी बोलतो आणि ठरवतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
सत्तेत राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची भावना आहे. आज एकनाथ शिंदे काही प्रमुख नेत्यांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अनेक महत्वाची खाती मिळावीत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होते. तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का हे आज स्पष्ट होणार आहे. एकनाथ शिंदे यांची १२ मंत्रिपदांची शहा यांच्याकडे मागणी केल्याचे वृत्त पुढारी न्यूजने दिले आहे. तर भाजपने गृहखाते सोडण्यास नकार दिला आहे.