एमडी अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या तरुणास अटक:तरुणाकडून अडीच लाखांचे ड्रग्स जप्त

3 hours ago 1
एमडी हा अमली पदार्थ जवळ बाळगणार्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून अडीच लाखांचे एलएसडी आणि एमडीएमए जप्त केले. तेजस सुरेश गोपाल (२२, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड, मुळ रा. कोकोडी, मकरा, जि. कालीकत, केरळ) असे या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक कोथरूडमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वनाज मेट्रो स्टेशनजवळ सापळा रचला. मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ संशयित दिसल्याने त्याला पकडले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे ४८ हजार रुपयांचे एलएसडी आणि एमडीएमए हे अमली पदार्थ तसेच २ लाख रुपयांच्या एमडी एमएच्या ५० गोळ्या आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी त्याचा २० हजाराचा मोबाईल व दीड लाख रुपयांची दुचाकी असा ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड,सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलिस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव रवींद्र रोकडे, मयुर सूर्यवंशी,उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, नितीन जगदाळे, निलम पाटील आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.याबाबत पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article