Published on
:
23 Nov 2024, 2:18 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:18 pm
औसा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 औसा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार दिनकर माने यांचा त्यांनी 33 हजार 462 मतांनी पराभव करत आपला गड राखला. ते औसा विधानसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा विजयी झाले.२३ नोव्हेंबर रोजी शहरातील तहसील शेजारी असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतेमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला .औसा व निलंगा तालुक्यातील 68 गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात 309 मतदान केंद्रांवर 304307 पैकी 209593 इतके मतदान झाले होते.14 टेबलावर मतमोजणीस 23 फेऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या.पहिल्या फेरीपासून ते 23 व्या फेरीपर्यंत विद्यमान आमदार अभिमन्यू पवार याची आघाडी वाढत गेली. शेवटपर्यंत 23 व्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य 33462 ने वाढतच गेले.शेवटी त्यांनी विजयाला गवसणी घातली.विजयी उमेदवार अभिमन्यू पवार यांना 115590 तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार दिनकर माने यांना 82128 तर वंचित बहुजन आघाडीचे शिवाजी कुंभार यांना 4147मते मिळाली आहेत.
पोस्टल मतदानात अभिमन्यू पवार यांना आघाडी औसा विधानसभा मतदार संघात एकूण 2562 पोस्टल मतदारांनी मतदान केले त्यापैकी अभिमन्यू पवार यांना 1296 तर दिनकर माने यांना 1102 मते मिळाली.
मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त
तहसील जवळीत मतमोजणी केंद्रसभोंवती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडले नाही आणि मतमोजणी केंद्राच्या 500 फूट लांबपर्यंत बॅरिकेट लावून कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आला.
मतमोजणीच्या आठव्या फेरीपासून आमदार अभिमन्यू पवार यांची वाढत असलेली आघाडी लक्षात येताच कार्यकर्त्यानी तहसील कार्यालयाशेजारी गर्दी केली व फटाके फोडत गुलाल उधळत घोषणाबाजी करत जल्लोष केला. आमदार अभिमन्यू पवार यांची विजयी मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावर काढण्यात आली. क्रेन च्या सहाय्याने आमदार अभिमन्यू पवार यांना हार घालून आणि शहरात मोठं मोठे कट आऊट लावून, मिरवणूकसमोर विजयी गुलाल उधळला. तालुक्यातील अनेक गावात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.
नामदार अभिमन्यू पवार नावाच्या पोस्ट..
विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे औसा विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा निवडून आले त्यांनी गेल्या टर्म ला काँग्रेस चे बस्वराज पाटील यांचा 26 हजार मतांनी पराभव केला होता. त्यांनी मतदार संघात अनेक विकासकामे केल्याने जनतेने भरगोस मते देत दुसऱ्यांदा निवडून आणल्याने या टर्मला आमदार अभिमन्यू पवार यांचा मंत्री मंडळात नक्की समावेश होईल याची खात्री झाल्याने कार्यकर्ते नामदार अभिमन्यू पवार, भावी पालकमंत्री अशा पोस्ट करताना दिसून येत आहेत.