मतदानासाठी निवडणूक कक्षातून साहित्य नेण्यासाठी कर्मचार्यांनी केलेली गर्दी.Pudhari Photo
Published on
:
20 Nov 2024, 12:20 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:20 am
करमाळा : 244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 347 मतदान केंद्रे उपलब्ध करण्यात आली असून करमाळा तालुक्यातील 118 व माढा तालुक्यातील छत्तीस गावांचा यात समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली.
347 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी सहा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तब्बल 2 हजार 70 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचार्यांना साहित्य ने-आण करण्यासाठी 41 एस.टी. बसेस, तेरा मिनी बस, 18 जीप उपलब्ध करण्यात आले असून यासाठी 38 विभागीय पथके तयार करण्यात आली आहेत. जिंती व केम या दोन ठिकाणी पिंक मतदान केंद्रनिर्मिती करण्यात आली आहेत. या ठिकाणी सर्व महिला मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणार आहेत. सालसे व उमरड येथील मतदान केंद्र हे आयडियल बूथ म्हणून कार्यरत राहणार आहे.
पीडब्ल्यूडी बूथ मतदान केंद्र करमाळ्यातील 99 व 79 ही केंद्रे कोंढारचिंचोली व रोशेवाडी या दोन ठिकाणी युथ मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. एक हजारपेक्षा अधिक मतदान असलेल्या मतदान केंद्रावर बाकडे तसेच पिण्याचे पाणी तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. 36 मतदान केंद्रांवर निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी दिली.
14 पोलिस अधिकार्यांची फौज
करमाळा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत करमाळा मतदारसंघात निवडणुकीसाठी अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला असून तब्बल 14 पोलिस अधिकार्यांची फौज बंदोबस्तासाठी लावण्यात आली आहे.