कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवणं एका उमेदवारांच्या जीवाशी बेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे एका उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय.
येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचा प्रचार चांगलाच तापला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. त्यातच आता कल्याणमधून एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवणं एका उमेदवारांच्या जीवाशी बेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे एका उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. कल्याण पश्चिम मतदारसंघात काल जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत होते. यावेळी काही कार्यकर्त्यांचा उत्साहच उमेदवाराला नडलाय. हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या एका घटनेमुळे राकेश मुथा यांच्या जीवावर बेतले मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. या हारासोबत काही इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाके लावण्यात आले होते. अचानक या फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्यावर उडाली आणि केस जळले.
Published on: Nov 18, 2024 12:17 PM