कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर आधार, पॅन, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टचे काय करावे?

3 hours ago 1

आजच्या काळात कोणतेही सरकारी काम म्हणा किंवा इतर कोणतेही काम असो प्रत्येकाकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे असतात. बँक खाते उघडण्यापासून ते सर्व कामांसाठी त्यांची गरज असते. याशिवाय ही कागदपत्रे तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणूनही काम करतात. पण जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर या कागदपत्रांचे काय करावे. याबद्दल अनेकांना माहिती नसते. येथे जाणून घ्या जेणेकरून त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणीही त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करू शकणार नाही.

मतदार ओळखपत्र

व्होटर आयडीच्या माध्यमातूनच मतदान करण्याची संधी मिळते. पण एखाद्याच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याचे मतदार ओळखपत्र रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म-७ भरावा लागेल, त्यानंतर हे कार्ड रद्द होईल. मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी मृतव्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते.

आधार कार्ड

आधार कार्ड रद्द करने किंवा परत करण्याची कोणतीही सुविधा नाहीये. पण तुम्ही तुमचं आधारकार्ड लॉक करू शकता. आधार कार्ड लॉक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.uidai.gov.in वर जावे लागेल. येथे ‘माय आधार’ निवडा आणि त्यानंतर ‘आधार सर्व्हिसेस’वर क्लिक करून लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा. आता येथे १२ अंकी आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड टाका. यासोबतच सेंड ओटीपी ऑप्शन सिलेक्ट करा. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो टाका. यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डेटा लॉक/अनलॉक करण्याचा पर्याय मिळेल, जो तुम्ही निवडू शकता. लॉक बटणावर क्लिक केल्यास बायोमेट्रिक डेटा लॉक होईल. याशिवाय जर व्यक्ती मृत्यूपूर्वी आधारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा किंवा सबसिडीचा लाभ घेत असेल तर संबंधित विभागाने त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती त्या व्यक्तीला द्यावी. जेणेकरून त्यांचे नाव योजनेतून वगळले जाईल.

पॅन कार्ड

इनकम टॅक्स भरण्याबरोबरच बँक आणि डीमॅट खाते उघडण्यासारख्या सर्व कामांमध्ये पॅनकार्ड आवश्यक आहे. पण पॅनकार्डधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांनी त्याचे कार्ड परत करावे. यासाठी मृताच्या कुटुंबीयांना आयकर विभागाशी संपर्क साधावा. पॅनकार्ड परत करण्यापूर्वी मृतव्यक्तीची सर्व खाती दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित किंवा बंद करावीत. जेणेकरून नंतर या कामात अडचण येणार नाही.

पासपोर्ट

आधार कार्डप्रमाणे पासपोर्ट रद्द करण्याची कोणतीही सुविधा नाहीये. पासपोर्टची कालमर्यादा संपल्यानंतर ते अवैधय ठरणार आहे. अशावेळी पासपोर्टची डेडलाईन संपेपर्यंत पासपोर्ट ठेवावा, जेणेकरून तो कोणत्याही चुकीच्या हातात पडणार नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article