Devendra Fadnavis Maharashtra New CM : कुठे मंत्रिपदासाठी तर कुठे मुख्यमंत्रिपदासाठी; महायुतीच्या नेत्यांचं विठ्ठल-रुक्मिणीला साकडं
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेImage Credit source: ANI
सोलापुरात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी विठ्ठल-रुक्मिणीला साकडं घातलं आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठ्ठल-रुक्मिणीला साकडं घातलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे विठ्ठल मंदिरात भजन किर्तन करत विठ्ठलाला साकडं घातलं आहे. विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांकडून भजन करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत तर आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळावे यासाठी घालण्यात साकडं घालण्यात आलं आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झालेले सुभाष देशमुख यांनाही मंत्रिपद देण्यासाठी साकडं घालण्यात आलं.