अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात येत असताना त्या मुलीसह आणखी एका अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागला.File Photo
Published on
:
19 Nov 2024, 2:05 pm
Updated on
:
19 Nov 2024, 2:05 pm
शिरोली एमआयडीसी : मध्यप्रदेश मधून अपहरण झालेल्या चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात येत असताना त्या मुलीसह आणखी एका अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यात शिरोली एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरोली पोलीस ठाण्यात चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलगीचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तात्काळ पथके नेमून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कोल्हापूर बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक केले असता संबंधित मुलगी बस व रेल्वेने जात असल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले. त्या आधारे सदर अल्पवयीन मुलगी ज्या रेल्वेने गेली. त्या रेल्वेची माहिती रेल्वे स्टेशन वरुन घेतली. पुढील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पोलिसांना व स्थानिक पोलिसांना माहिती देऊन खाजगी वाहनाने पोलीस ठाण्याकडील पथकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक कावडे, सहायक फौजदार कोळी, पोलीस अंमलदार गोरे यांना रवाना केले होते.
मुलगी रेल्वेने गुजरात राज्यामध्ये गेल्याचे दिसून आले. तेथील सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे अल्पवयीन मुलगी ज्या रेल्वेत बसून गेली. त्याचा पाठलाग केला आणि मध्यप्रदेश मधील पोलिसांची संपर्क साधून अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यास सांगून तिला पुन्हा मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. शिरोली एमआयडीसी पोलिसात दाखल गुन्ह्यातील अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलगीचा शोध घेत असताना तासगांव जि. सांगली येथील अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी मिळून आली. तिला ताब्यात घेऊन तासगांव पोलीसांच्या ताब्यात दिले. तासगाव पोलिसांनी मुलीला तिच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले. अशा रीतीने शिरोली एमआयडीसी पोलिसांना दुहेरी यश मिळाले. शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे..