कोल्हापूर : शिरोलीतील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी तडीपार

4 days ago 2

शिरोलीतील सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Published on

19 Nov 2024, 2:01 pm

Updated on

19 Nov 2024, 2:01 pm

शिरोली एमआयडीसी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हददीतील सराईत गुन्हेगार रोहित शहाजी सातपुते (वय वर्ष २६ रा.विलासनगर,माळवाडी, शिरोली पुलाची ता.हातकणंगले) याला कोल्हापूर जिल्हयाच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. याप्रकरणी मंगळवार (दि. १९) आदेश काढण्यात आला.

रोहित सातपुते याच्याविरुद्धात गर्दी, मारामारी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दरोडा, नुकसान करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेच्या हददीमध्ये सातपुते याने दगड-काठ्यांनी गाडीच्या काचा फोडून नुकसान करुन एकास जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगाराविरुध्द सन २०२२ ते २०२४ मध्ये मालमत्तेविरुध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग व पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी विभाग यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांनी त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्हयाचा व सद्यस्थितीचा विचार करुन सातपुते याला कोल्हापूर जिल्हाच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी सुजितकुमार यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल गायकवाड,सहा.पोलीस निरीक्षक,शिरोली एमआयडीसी पोलीसांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article