खळबळजनक! ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुख यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला

2 hours ago 1

अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोल्यात पृथ्वी देशमुख यांच्यावर सराईत गुन्हेगारांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते अकोला पोलीस ठाण्यात जमले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचीदेखील माहिती मिळत आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आला आहे. या प्रकरणी काय-काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला. अकोला शहरातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर या हल्लादरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली.

दरम्यान, आमदाराच्या मुलावर हल्ल्या झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषी नगर भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

नितीन देशमुख यांनी या घटनेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलावर आज चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून बाकीच्यांचा शोध घेत आहेत, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article