Ratnakar Gutte | पूर्णेत कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष
गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:18 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:18 am
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: गंगाखेड विधानसभा निवडणुकीची गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयात आज मतमोजणी झाली. एकूण ३१ मतमोजणी फेरी अखेर महायुती पुरस्कृत रासपाचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे यांना एकूण १ लाख ४१ हजार ७५६ मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांना एकूण १ लाख १४ हजार २९५ मते मिळाली.
डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी २७ हजार ४६१ मतांची आघाडी घेत दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निकालानंतर पूर्णा शहरातील आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या संपर्क कार्यालया समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.
यावेळी मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, विश्वनाथ होळकर, गोविंद ठाकूर, संदीप कदम, साईनाथ बोबडे, देवराव साखरे, श्रीनिवास कदम, विनायक कदम, नलबले, मुंजाजी कदम, सोनू ठाकूर, परमेश्वर डहाळे, प्रसाद डहाळे, नामदेव गायकवाड, शिंदे गट शिवसेनेचे अंकित कदम आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.