महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कौल आता स्पष्ट होत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र 11 वाजेनंतर चित्र स्पष्ट झाले. महायुतीने 200 चा आकडा पार केला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा भाजप आणि मिंधेंवर निशाणा साधला आहे.
गरज सरो वैद्य मरो!
दिल्लीत निर्णय झाला.
भाजपा आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करत नाही.
आता काय?@mieknathshinde
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2024
वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण आहे. त्यानुसार आता भाजपला मिंधेंची गरज उरलेली नाही. त्यामुळे याबाबत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गरज सरो वैद्य मरो! दिल्लीत निर्णय झाला. भाजपा आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करत नाही. आता काय?, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच हा जनमताचा कौल नसून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. ballot पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही! लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!, असेही संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही.ballot पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर
निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल.
हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही!
लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2024