गाव पातळीवरील व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध:कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेचे विभागीय अध्यक्ष हस्तीमल बंब यांची ग्वाही
4 hours ago
1
गुंतागुंतीचे नवीन नवीन कायदे यामुळे त्रस्त असलेल्या थेट गाव पातळीवरील व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याकरिता व्यापारी महासंघ कटिबद्ध असून देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची एकमेव असलेली कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेच्या माध्यमातून केंद्र शासनाचे अनेक कायदे व्यापाऱ्यांना कसे फायदेशीर ठरतील याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याची माहिती संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी शनिवारी ता. ३० येथे दिली. येथील गणेश इन सभागृहात त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मराठवाडा विभागीय सचिव सुखदेव बजाज, महिला अध्यक्ष सिता मोहिते पाटील, सचिव आनंदी अय्यर, गोविंद साकला, रामजी मोहिते, कॅटचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी बंब म्हणाले की, प्रत्येक गाव ते शहर पातळीपर्यंत व्यापारी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. त्यांना त्यांना प्रशिक्षित करून व्यवसाय वाढीकरता प्रयत्न करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हिंगोलीच्या संघटनेकडून केल्या जाणाऱ्या कामाचे कौतूक केले. यावेळी सिता मोहिते पाटील यांनी महिलांनी व्यवसाय व्यापारात उतरणे महत्त्वाचे असून ज्यामुळे व्यवसाय वृद्धी होऊन कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत पण वाढणार आहे. महिलांना यातून सन्मानाचे स्थान मिळणार असल्यामुळे महिलांनी या क्षेत्रामध्ये धाडसीने व चिकाटीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी व्यापारी महासंघाच्या उपाध्यक्ष पदी प्रशांत सोनी , राजेश बगडीया, सचिव रवींद्र सोनी, सहसचिव ओम नेनवाणी, पवन राठी, शहर उपाध्यक्षपदी रजनीश पुरोहित यांची निवड केली. जिल्हा महिला व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी शीतल तापडिया यांची निवड झाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
गाव पातळीवरील व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध:कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेचे विभागीय अध्यक्ष हस्तीमल बंब यांची ग्वाही