गृहिणींनो! पैसे वाचवण्याच्या टिप्स वाचा, गुंतवणूकीचे 5 पर्यायही जाणून घ्या

3 days ago 1

घराचे बजेट बनवण्याची जबाबदारी घरातल्या गृहिणीवर असते. कुठे खर्च करायचा आणि पैसे कसे वाचवायचे हे देखील गृहिणींना माहिती असते. पण बहुतेक गृहिणी आपले पैसे फक्त घराच्या पर्समध्येच ठेवतात. त्यातून पैशांची बचत होते, पण पैशात अजिबात वाढ होत नाही.

गृहिणींसाठी स्मार्ट फायनान्स टिप्स आवश्यक आहेत. कॅशकरोच्या संस्थापक स्वाती भार्गव यांनी पर्सनल फायनान्सबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती गृहिणींनी अवलंबल्यास फायदा होऊ शकेल. जाणून घ्या.

पैसे वाचवण्याच्या टिप्स

सुरुवातीला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपला खर्च एका कागदावर लिहा आणि आपण कोठे जास्त खर्च करीत आहात, हे पाहण्याचा प्रयत्न करा. मोबाइलऐवजी कागदावर करा कारण प्रत्यक्षात काय घडत आहे, हे स्पष्टपणे समजते.

सवलती आणि डील्सचा लाभ घ्या

तुम्ही वेगवेगळ्या ऑफर्सचा, डील्स फायदा घेऊ शकतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती असते. कॅशबॅक ऑफर्स आणि शॉपिंग करताना त्यांचा वापर अगदी छोट्या छोट्या गोष्टीही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आपल्या जवळचे किराणा दुकान असो किंवा ऑनलाइन शॉपिंग सेल, आपल्याला सर्वांची मदत मिळू शकते.

बचतीला प्राधान्य द्या

गरज असेल तेव्हाच तुमची बचत चालेल असं नाही. तुमच्या अनेक गोष्टींची पूर्तता होऊ शकते, हे समजून घ्यायला हवं. बचत देखील आपल्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत बनू शकते, म्हणून बचतीला प्राधान्य द्या. आपण मासिक बजेटमधून बचतीचा काही भाग बाजूला ठेवला पाहिजे.

गृहिणींसाठी योग्य गुंतवणूक पद्धती

बचतीनंतर गुंतवणुकीची पाळी येते. गृहिणींनी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे जिथे संपत्ती वाढते आणि जोखीम देखील कमी होते. अशा वेळी काही पारंपारिक पर्याय पहायला मिळतात. जाणून घ्या.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

पीपीएफ कमी जोखमीत पैसे सुरक्षित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. वर्षभरात जास्तीत जास्त 12 वेळा डिपॉझिट करता येते. पीपीएफमध्ये खाते चालवण्यासाठी किमान 500 रुपये आवश्यक आहेत, जेणेकरून आपण हळूहळू या खात्यात आपले पैसे कमवू शकता. गृहिणींसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

म्युच्युअल फंड किंवा एसआयपी

म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही एसआयपी घेऊ शकता. फोन अ‍ॅपच्या माध्यमातूनही यात गुंतवणूक करता येते. छोट्या ठेवींमध्ये चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला माहित नसेल, पण 100 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात केली जाऊ शकते.

राष्ट्रीय पेन्शन योजना

तुमच्याकडे एकूण 2000 रुपयांपर्यंत रक्कम असेल तर पोस्ट ऑफिसच्या नॅशनल पेन्शन स्कीममध्येही जमा करता येते. यात दरवर्षी 9 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. खर्च कमी असला तरी योग्य परतावा मिळू शकतो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

यात सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज दर मिळतो. त्यामुळे तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा पर्यायही निवडू शकता. ही पोस्ट ऑफिसची योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला अधिक फायदा मिळतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article