Published on
:
29 Nov 2024, 10:39 am
Updated on
:
29 Nov 2024, 10:39 am
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबिंयांच्या दु:खात सहभागी आहे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाहीर केले. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 29, 2024