गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. ही बस नागपूरहून गोंदियाकडे येत होती. या बसमधून 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. बस उलटून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत प्रवाशांच्या कुटुंबांना तातडीनं मदतीची देखील घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आता या अपघाताचं कारण समोर आलं आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या ठिकाणी शिवशाही बसचा अपघात झाला, बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस अनियंत्रित झाली. अनियंत्रित बस पलटी झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा व चंद्रपूर जिल्हा येथील हे सर्व प्रवासी रहिवाशी आहेत. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर 29 जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे, तर 26 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये एकूण बारा जणांचा मृत्यू झाला असून, मृत प्रवाशांच्या नावाची यादी समोर आली आहे.
1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
10) अनोळखी पुरुष
11) अनोळखी पुरुष
12)अनोळखी