छ.संभाजीनगर : अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे ठार

1 hour ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

29 Sep 2024, 5:24 pm

Updated on

29 Sep 2024, 5:24 pm

पैठण : अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.२९) सायंकाळी पाचोड- पैठण मार्गावरील पेट्रोल पंपासमोर झाला. छगन एकनाथ भांगळ (वय ५८ रा. थेरगाव ता.पैठण) व गोरख भाऊराव हिगले (वय ६०, रा. लिंबगाव ता.पैठण) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, पाचोड येथे गोरख भाऊराव हिंगले यांच्या मोटरसायकलमधील पेट्रोल संपले. त्यामुळे ते छगन भांगळ यांच्या मोटरसायकलीवरून पैठण रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणण्यासाठी जात होते. यादरम्यान अज्ञात वाहनाने पाठीमागून मोटर सायकलला जोराची धडक दिली. परिसरातील नागरिकांनी दोघांना पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच सपोनि शरदचंद्र रोडगे, पोलीस उपनिरीक्षक रहाटकर यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू असून अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर रहाटकर हे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article