छगन भुजबळ यांचा येवल्यातून विजय:मनोज जरांगे यांच्या विरोधानंतरही गड राखला

3 hours ago 1
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवल्यातून विजयी झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधानंतरही त्यांनी आपला गड राखला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा जवळपास 27 हजार मतांनी पराभव केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले यावेळी छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना साथ दिली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोधकेल्यानंतर भुजबळांना विरोध केला होता. पण शरद पवारांनी विरोधात उमेदवार देऊनही भुजबळ विजयी झाले. भाजपची पुन्हा उद्धव ठाकरे यांना साद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महायुती पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा महायुतीकडे जातील का हे पहावे लागणार आहे. ते कोथरूडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकात पाटील यांना उद्धव ठाकरे हे पुन्हा महायुतीच्या सोबत आल्यास तुमची काय भूमिका असेल? असे विचारण्यात आले असता त्यावर बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे. आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. काही अपक्षांची साथही मिळणार आहे. अशा परिस्थिती महायुतीकडून उद्धवजींना आमंत्रण दिले जाण्याची शक्यता नाही. त्यांनी स्वत: पुढाकार घेतल्यास भाजपचे वरिष्ठ नेते यावर विचार करतील, असे पाटील म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article