छोटे पक्षच किंगमेकर ठरणार - महादेव जानकर:पाठिंबा हवा असल्यास मंत्रिमंडळात सामील करण्याची दोन्ही आघाड्यांसमोर अट

5 hours ago 1
विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून संख्याबळाची जमवाजमव केली जात आहे. यंदाच्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्व राहणार आहे. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छोटे पक्षच किंगमेकर ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच रासपचा पाठिंबा हवा असल्यास मंत्रिमंडळात सामील करावे, अशी अट देखील महायुती आणि महाविकास आघाडीसमोर ठेवली आहे. महादेव जानकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींचे आभार मानतो. लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदारांचा टक्का वाढल्यामुळे अभिनंदन करतो. हा वाढलेल्या टक्क्यामुळे परिवर्तन होण्याची शक्यता असू शकते. मागील विधानसभा निवडणुकीत एक आणि वरच्या सभागृहात एक असे आमचे दोन आमदार होते. पण आता आमचे दोनाचे चार, चाराचे सहा होतील. जनतेचा कौल शेवटी, त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले यश मिळेल, असा मला विश्वास आहे. आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरू कोणासोबत जाणार यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले, मेजॉरिटी महाविकास आघाडी किंवा महायुतीला असेल तर आमचा कोणाला विरोध असेल असे नाही. आम्ही दोघांसोबतही जायला तयार आहोत. सध्यातरी 50-50 टक्के दोघांची शक्यता आहे. आम्ही सध्या महायुती किंवा महाविकास आघाडी बरोबर नाही. आम्ही छोटे पक्ष असल्यामुळे किंगमेकरची भूमिका निभावणार आहोत. महादेव जानकरांच्या अटी काय? महादेव जानकर म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून कोणाचे निमंत्रण किंवा फोन आलेला नाही आणि आम्ही बिन बुलाय कोणाकडे जाणार नाही. आम्हाला मंत्रिमंडळात भागीदारी पाहिजे. आमची इच्छा आहे, आमचे जर 12 आमदार आले तर 12 चे 12 कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे. आणि जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्रीपण आमचा पक्षाचा झाला पाहिजे. त्यांनी हे मान्य केले, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा”, अशा अटी महादेव जानकर यांनी ठेवल्या आहेत. हे ही वाचा... महाराष्ट्रात 'मुख्यमंत्र्यांची खुर्ची' बंडखोरांच्या हाती:भाजप महायुतीच्या 31 जागांवर थेट इम्पॅक्ट; समजून घ्या शिंदे-अजितदादांची आतली खेळी पोल ऑफ पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीचे (भाजप महायुतीचे) सरकार स्थापन होणार आहे. 11 एजन्सीचे एक्झिट पोल महायुतीला सरासरी 146 जागा देत आहेत. महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा असून बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे. म्हणजे भाजप आघाडी विजयाच्या जनळवर उभी आहे. सविस्तर वाचा... सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची गरजच पडणार नाही:राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा दावा आम्हाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल त्यामुळे आम्हाला सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची गरजच पडणार नाही, असा दावा भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जर अपक्ष आमदाराला महायुतीला पाठिंबा द्यायचा असेल तर ते देऊ शकतात, आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे दानवे म्हणाले. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article