जगातील सर्वात मोठं विमानतळ, इतकं मोठं की संपूर्ण मुंबई त्यात बसेल

2 hours ago 1

जगात विमानतळाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. विमानतळ देशांना आणि शहरांना लोकांशी जोडतात. जगातील काही देश सोडले तर जवळपास सर्वच देशांमध्ये अनेक विमानतळ आहेत. पण सौदी अरेबियाचे किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. हे विमानतळ सौदी अरेबियातील दमाममध्ये अंदाजे 780 स्क्वेअर किलोमीटरवर पसरले आहे. हे विमानतळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सौदी अरेबियाचे राजा फहद बिन अब्दुलअजीझ अल सौदी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हे विमानतळ जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावर उत्तम लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत. आणखी एक गंमत म्हणजे हे विमानतळ इतके मोठे आहे की संपूर्ण मुंबई शहर त्यात बसू शकेल.

विमानतळाची क्षमता किती आहे?

हे विमानतळ ऑक्टोबर 1999 मध्ये पहिल्यांदा कार्यान्वित झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विमानतळाच्या मदतीने दरवर्षी सुमारे 2 कोटी लोक प्रवास करतात. प्रवासी क्षमतेच्या बाबतीत हे विमानतळ जगातील तिसरे मोठे विमानतळ आहे. या विमानतळावरून दरवर्षी 1 लाख 25 हजार टन मालाचा पुरवठा होतो. विमानतळ संकुलाच्या आत एक मशीद देखील आहे, ज्यामध्ये सुमारे 2 हजार लोकं एकाच वेळी नमाज अदा करू शकतात.

या विमानतळावर एअरबस A340-600 आणि बोईंग 747-400 (लांब पल्ल्याची, उच्च क्षमतेची वाइड-बॉडी विमाने) ही दोन मोठी विमाने सहजपणे सामावू शकतात. या विमानतळावर दोन समांतर धावपट्टी आहेत, प्रत्येक धावपट्टी 4,000 मीटर (13,123 फूट) लांब आहे.

किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बहरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (BAH) दरम्यान फक्त 47 मैल (76 किमी) अंतर आहे. किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ सौदी अरेबियाला दुबईच्या व्यस्त महानगराशी जोडते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article