जनता भाजी बाजाराने घेतला मोकळा श्वास:फळ विक्रेत्यांच्या विरोधामुळे वातावरण तापले; बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही शाब्दिक वाद

3 hours ago 1
महानगरपालिका क्षेत्रातील गांधी चौक आणि ओपन थिएटर ते फतेह चौक, शिवनी, सर्वेापचार रुग्णालयाच्या रोडवरील अतिक्रमणे याचसोबत जनता भाजी बाजार येथील अतिक्रमित किरकोळ व्‍यावसायिकांच्‍या वाहतुकीस अडथळे निर्माण करणारे अतिक्रमण गुरुवारी काढण्यात आले. यामुळे जनता भाजी बाजारातील कोंडी दूर झाल्याने या बाजाराने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. मनपा नगररचना, अतिक्रमण निर्मूलन विभागाद्वारे ही कारवाई करण्‍यात आली. दरम्यान, जनता भाजी बाजारातील फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण काढताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विरोध झाल्याने गुरुवारी दुपारी वातावरण काहीसे तंग झाले होते. अतिक्रमण कारवाई पुढेही सुरुच राहणार शहरातील महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत मुख्य रस्त्यांवरील रहदारीस अडथळे ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, ती अशीच सुरु राहणार आहे. अतिक्रमणाला कुठे विरोध झाला तर प्रसंगी पोलिसांची मदत घेतली जाईल. अतिक्रमणधारक अस्थायी फेरीवाले यांनी याची नोद घ्यावी. - डॉ. सुनील लहाने, मनपा आयुक्त.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article